हिमवती.
- Hashtag Kalakar
- 1 hour ago
- 1 min read
By Arham Sushma Sudarshan Bandekar
श्वेत शाल अंथरुणी सृष्टीवरती,
शिशिरोत्सव बहरतो होताच तुझे स्वागत;
बर्फ लागुणी अंगावरती,
अंगावर येणारा काटा राहतो अवगत.
स्मृति आठवणींची सारी तुझ्यावरती,
तनु मखमली तुझा मार;
लाकूड इंधनाची सांगड चुलीवरती,
मोटारीवर फिरत अनुभवतो तुझ्या लाटा फार!
हाता-पायात मौजे व कानटोपी कानावरती,
हिमपुरुष सजले सारे आज स्वयंवर तुझे राणी;
बर्फ फेकत जणू उत्साह उधळतात एकमेकांवरती,
सकाळी आंघोळीसाठी नको वाटते थंडगार पाणी!
चादरीचा उपयोग नाही जणू तुझे कवच माझ्यावरती,
आपल्यासारखे झाडे-फुले ही धुकांच्या चादरीत सुप्त;
ठिपके रंगवावे तसे दवांचे थेंब पानांवरती,
खिडकीतून समोरचे दृश्य देखील झाले गुप्त.
शरीरासाठी लोकरी कपडे विकत घेणे शैलीवरती,
असते तुझी मंद झुळूक प्रभातफेरीची ही उत्तम वेळ;
तुझ्या आगमनात खेळ सारे बर्फावरती,
खेळाडूंची उत्कंठा खेळताना तुझ्यासोबत खेळ.
रात्रीची चर्चा पुन्हा शेकोटीवरती,
तुझ्या मायेच्या स्पर्शाने रात्रकीडा ही शांत;
आनंदाने जेवतो गरमागरम भोजन ताटावरती,
कष्टाळू जण विश्रांती घेत निवांत.
By Arham Sushma Sudarshan Bandekar
