मेघराज.
- Hashtag Kalakar
- Dec 15, 2025
- 1 min read
By Arham Sushma Sudarshan Bandekar
गरमीने वैतागला आहे शेतकरी, जरा उधळशील का तुझ्या रिमझिम सरी?
तूच राखला आहेस त्याचा व्यवसाय, जणू तुच आहेस त्याच्यासाठी दुधावरची साय.
तुझ्यामुळे हाती लागतं त्याच्या हक्काचं सुख, सोबतच जिरवतेस या जगाची सारी भूक.
शेतकर्याच्या या कथेचं प्रत्येकाला असावं भान, मिळालेल्या अन्नाचा राखावा मान!
फक्त नसते सुकलेले गरमीने रान, भूतलावरचा प्रत्येक जीव असतो हैरान.
तुझ्या विचारात भटकत असतात पशुपक्षी, या कहाणीचे चक्र फिरते दरवर्षी.
त्यांच्या पीडेचं कारण असते ऊष्मा, उपाय म्हणून भागवशील यांची तृष्णा?
तुझ्या पहिल्या सरीत भिजण्याची आस होतेय व्यक्त, करशील ना आम्हाला या गरमीतून मुक्त?
ऋतूचक्रातील येऊन तू वर्षा, पुरेसा पण नको अवकाळ फारसा.
पावसाच्या आगमनात पावशा लावतो सूर, नाचत रंगी फुलवून पिसारा मयूर.
जशी तू सजवलीस पावसाची अंबारी, जीवांचे मन भरले उत्साही!
बालपणाचा हर्ष तरंगताना नौका, रंगीबेरंगी छत्र्या नाचवत सजवल्या सार्या चौका!
भागूणी तहान प्रफुल्ल स्वच्छ धरती, लाभते समुद्राला लाटांची भरती.
मातीचे स्नान होताच दरवळे रम्य सुगंध, निसर्ग घाटी विचारांची गती होते मंद!
पर्यटकांचे दिवे वसंत उजळले सुशोभित दुर्ग, शिक्षणाचा वारसा चालवत सजले सारे वर्ग.
श्यामसुंदर रूप हे कमळ पुष्य, मुकुट तुझे सप्तरंगांचे धारूनी इंद्रधनुष्य.
तुझ्यामुळे घेतात मत्स्य जन्म नवा, माणसाला तुझ्यात भिजताना चिखल ही वाटतो हवा-हवा.
सरींचा आनंद घेत आता मन भरले, शाळा भरली तसे सर्व जीव एका छताखाली जमले.
थंडीचा स्पर्श पुन्हा हवा नव्याने, गरमागरम भज्या खाऊ गुण्यागोविंदाने.
बेडकाचे डरावडराव तलाव झाली तुडुंब, घराची वीज गेल्यावर खेळात रमतं सारं कुटुंब!
मनाचा उत्सव करणार हिरवळ उपवन, अभि सणांचा येणार श्रावण!
विठ्ठलाचा धावा तीर्थयात्री चालता पंढरी, नारळीपौर्णिमेचे समर्पक कोळी बांधव न्यारी.
शहरे जोडून रंगणार दहीहंडी स्पर्धा, श्रीकृष्णा चे स्मरण करताच दह्याची हो सुधा!
मोदकांचा नैवेद्य तुला श्रीगणेशा, नवरात्रीचा सण आला पहिली होणार घटस्थापना.
By Arham Sushma Sudarshan Bandekar
.

Best
Well combined