उदे गं अंबे.
- Hashtag Kalakar
- 3 hours ago
- 1 min read
By Arham Sushma Sudarshan Bandekar
विश्वासाच्या नजरा घालतात तुला साद,
सत्याचा विजय करत संकटाशी करते मात;
लेकरांभवती सुरक्षा कवच जसा तुझा आशीर्वाद,
प्रकाश पसरे जेव्हा ज्योतीला आधार देते कापसाची वात.
लेकरांच्या उद्धारासाठी चरा-चरात अवतरली तू माऊली,
कष्टाळू मुंग्यांसमान सजली भक्तांची आवली;
यशासाठी सकारात्मकतेचे बळ मागत तुझ्या पाऊली,
नतमस्तक भक्तांच्या हाकेला तू धावली.
तुझ्या मातृत्त्वाने आम्हा गात्रं लाभला,
दुर्बुद्धि अनुसरून मानव पिसाळला;
तेव्हा खर्या अर्थाने लेकरा दृष्ट मारला,
तुझ्या क्रोधाने फक्त आमचा अहंकार चिरडला.
तुझ्या नगरीत फिरताना भासते माहेरची आमराई,
तुझ्याविना या संसाराची उत्पत्ती नाही;
दुःखी मनाला सुखाची निशा मिळे जेव्हा गाते तू अंगाई,
जणू भक्ताला ममतेची ऊब जगात माही.
संपूर्ण देशात झाली नवरात्र साजरी,
तुच रेणुका, सप्तश्रुंगी व तुळजाई;
होणार धन, शक्ती व ज्ञानाची भरजरी,
अनाथांची ही तूच आई......
उदे गं अंबाबाई!
By Arham Sushma Sudarshan Bandekar

Comments