top of page

त्यांना महाराज आम्ही म्हणत - By Vedika Waingankar

1 hour ago
2 min read

Written By: Vedika Waingankar

Category: Poetry

Competition: Poetry and Creative Writing Competition 2026

Vedika Waingankar presents a poignant piece of poetry titled "त्यांना महाराज आम्ही म्हणत" in the Poetry and Creative Writing Competition 2026 hosted by Hashtag Kalakar. This competition brings together diverse voices from around the world, celebrating creativity and expression. Vedika's work stands as a powerful tribute to a revered historical figure, deeply rooted in Marathi culture and history.

About the Work

"त्यांना महाराज आम्ही म्हणत" is a stirring homage to the legendary Maratha king Shivaji Maharaj. Vedika's poetry is rich with themes of courage, leadership, and devotion. The vivid imagery and heartfelt emotion capture the essence of the respect and admiration the people hold for Shivaji Maharaj. The rhythmic cadence and powerful language make it a compelling read.

त्यांना महाराज आम्ही म्हणत

Original Submission by Vedika Waingankar

त्यांना महाराज आम्ही म्हणत!!!

सोळाव्या वर्षी घेऊन आण, हाती घेतला वसा ;

रक्ताभिषेक करुनी त्यांनी, जीव लावला असा.

प्रेम भरुनी उरात आणि मनगटात हिम्मत !

असे दाखविले साहस ज्यांनी, त्यांना महाराज आम्ही म्हणत !

माथी चंद्रकोर त्यांच्या, गळ्यात सूर्यमाळा ;

जिंकून घेशील जग सारे तू, जिजाऊंच्या बाळा .

रगात सांडूनी लोकांसाठी, त्यांनी मोजली किंमत !

असे दाखविले साहस ज्यांनी, त्यांना महाराज आम्ही म्हणत !

रयतेवरून ओवाळून टाकला, जीव त्यांनी अनमोल ;

असा देवागत राजा आमुचा, काय करावं त्याचं मोल?

गडावरून गड जिंकूनी, मोठी केली त्यांनी करतूत !

असे दाखविले साहस ज्यांनी, त्यांना महाराज आम्ही म्हणत !

खानांचा करुनी वध, स्थापिला स्वराज्याच्या न्याय ;

पुण्याईचे बांधून देऊळ, धन्य झाली ती माय .

आया- बहिणींचा मान राखिला, मानवी लांडग्यांना ठेचत !

असे दाखविले साहस ज्यांनी, त्यांना महाराज आम्ही म्हणत !

आई भवानीची कृपा, त्यांना रायेश्वराचे वरदान;

मावळ्यांच्या साथीने असे दिले, स्वराज्याचे दान.

धर्मापेक्षा मोठी माणुसकी, असा धडा आम्हा शिकवत !

असे दाखविले साहस ज्यांनी, त्यांना महाराज आम्ही म्हणत !

सत्याला देऊनी बळ, केली असत्यावर मात ;

स्वाभिमान जागवून केले, गुलामीशी दोन हात.

मराठ्यांच्या पाठीशी उभे, जणू दिव्य कोणी दैवत ;

असे दाखविले साहस ज्यांनी, त्यांना महाराज आम्ही म्हणत!

---

About the Competition

The Poetry and Creative Writing Competition 2026 by Hashtag Kalakar is a prestigious event that invites writers and poets from various backgrounds to showcase their talent. This competition aims to foster creativity and provide a platform for unique voices to be heard and appreciated globally.

We extend our gratitude to Vedika Waingankar for sharing her inspiring work, "त्यांना महाराज आम्ही म्हणत," with us. It is a distinguished contribution to the Poetry and Creative Writing Competition 2026, and we commend her for capturing the spirit of bravery and reverence through her poetry.

About Hashtag Kalakar

Hashtag Kalakar is a creative platform dedicated to providing artists, writers, singers and other creative talents with opportunities to showcase their work and reach wider audiences through competitions, features and creative initiatives.

 
 
 

Recent Posts

See All

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page