top of page

आनंदी असे जगूया - By Vedika Waingankar

1 hour ago
2 min read

Written By: Vedika Waingankar

Category: Poetry

Competition: Poetry and Creative Writing Competition 2026

In a heartfelt entry for the Poetry and Creative Writing Competition 2026, Vedika Waingankar presents "आनंदी असे जगूया." This Marathi poem is a beautiful reflection on living life with gratitude and positivity, transcending negativity, and cherishing the good in others. Through this work, Vedika invites readers to embrace a joyful existence by focusing on the positive aspects of life and relationships.

About the Work

"आनंदी असे जगूया" is a poignant exploration of themes such as gratitude, kindness, and the importance of maintaining positive relationships. Vedika Waingankar masterfully crafts a mood of serenity and wisdom, encouraging readers to forgive, to learn from others, and to appreciate the small joys in life. The poem's gentle yet profound message is conveyed through vivid imagery and heartfelt sincerity.

आनंदी असे जगूया

Original Submission by Vedika Waingankar

आनंदी असे जगूया.....

कुणी वाईट वागले, ते सर्व विसरून जाऊया;

देवाकडे न्याय सोपवून, आपण चांगले राहूया;

नाती नसावीत कशी, हे त्यांच्यामुळे शिकूया;

आभार मानून त्यांचे, आनंदी असे जगूया.

कृतज्ञ भावनेने, देत कायम राहूया;

परत मिळेल का ते, सोडून विचार देऊ या;

देव हिशोब ठेवतोय, हे लक्षात कायम ठेवूया;

आभार मानून त्यांचे, आनंदी असे जगूया.

लहानांवर माया करूया, मोठ्यांना आदर देऊया;

द्वेष, राग फेकून प्रेम आपलेसे करूया;

आपल्यासाठी जे असतात, त्यांना कायम लक्षात ठेवूया;

आभार मानून त्यांचे, आनंदी असे जगूया.

शत्रू आला समोर, तरी चांगले कायम वागूया;

संस्कार मनात ठेवून, विनम्रतेने बोलूया;

प्रेमाने जिंकू जग, असे विचार मनात वसवूया;

आभार मानू त्यांचे, आनंदी असे जगूया.

खुश कायम राहूया, इतरांच्या आनंदाचे कारण बनूया;

नशीबवान स्वतःला समजून, कृतज्ञतेने जगूया;

आनंद देणारे क्षण सारे, मनात साठवून ठेवूया;

आभार मानून त्यांचे, आनंदी असे जगूया;

आभाळ मुठीत घेऊनही, पाय जमिनीवर रोवूया;

लोकांवर जळण्यापेक्षा, कौतुक त्यांचे करूया;

आपल्याला जे येत नाही, ते त्यांच्याकडून शिकूया;

आभार मानून त्यांचे, आनंदी असे जगूया.

वाईट चिंतताना दुसऱ्यांच, स्वतः जाणीव होऊ द्या;

शेवटी त्यालाच तोंड दाखवायचं, एवढं लक्षात असू द्या;

सर्वांशी चांगलं वागूया, सर्वांचं चांगलं चिंतूया;

आभार मानून सर्वांचे, आनंदी असे जगूया.

आपण इतरांशी वागतो, ते स्वतःशी वागून बघूया;

इतरांनाही मन असतं, असाही विचार करूया;

करुणा मनात ठेवून, इतरांशी असे वागूया;

आभार मानून त्यांचे, आनंदी असे जगूया.

---

About the Competition

The Poetry and Creative Writing Competition 2026 by Hashtag Kalakar celebrates the art of written expression, welcoming participants from diverse backgrounds to share their unique voices. This competition serves as a platform for writers and poets to showcase their talent and creativity, fostering a community of literary enthusiasts and storytellers.

We extend our heartfelt thanks to Vedika Waingankar for sharing "आनंदी असे जगूया" with us. Your contribution to the Poetry and Creative Writing Competition 2026 enriches our platform and inspires readers to live with gratitude and joy. Thank you for your beautiful expression and insight.

About Hashtag Kalakar

Hashtag Kalakar is a creative platform dedicated to providing artists, writers, singers and other creative talents with opportunities to showcase their work and reach wider audiences through competitions, features and creative initiatives.

 
 
 

Recent Posts

See All

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page