कलेचा उपासक तो
Updated: Jul 14, 2025
By Saili Parab
कलेच्या धुंदीत तो,
नवी कलाकृती घडवितो...
कलेच्या प्रेमात तो,
कलेलाच बहुरुपे सजवतो...
कलेत दंगुन तो,
कलेचेच रंग उधळतो...
आहारी जाऊन कलेच्या
दुनियेत नवी रीत चालवितो...
कलेचा उपासक तो,
जन्मभरासाठी कलाकार होऊन जगतो...
By Saili Parab

Comments