कट्टरता...
- Hashtag Kalakar
- 3 days ago
- 1 min read
By Vasucha Vasu
स्वतःच्या धर्माचं निष्ठेने पालन करत असाल तर कट्टर आहात तुम्ही
स्वतःच्या धर्माचं पालन करताना इतर धर्मांना तुच्छ समजत नसाल तर कट्टर आहात तुम्ही
एखादया महिलेवर अत्याचार झाला आणि तिचा धर्म न बघता तुम्ही त्याविरुद्ध आवाज उठवला तर कट्टर आहात तुम्ही
धर्माच्या नावावर आतंकवाद करत नसाल तर कट्टर आहात तुम्ही
देशासाठी शहीद होणाऱ्या सैनिकाचा धर्म बघत नसाल तर कट्टर आहात तुम्ही
धर्मस्थळांवर भाषण देत नसाल आणि भाषण करताना धर्म आणत नसाल तर कट्टर आहात तुम्ही
कट्टरता ना कुठल्या धर्माची असते ना कुठल्या पंथाची ती असते माणुसकी आणि देशभक्तीची हे पाळत असाल तर कट्टर आहात तुम्ही.
By Vasucha Vasu
Comments