सुर्य सुत
By Vikas Rajendra Pisore
घर्षणाच्या संकरातुन उत्पत्ती निर्मिलेल्या
हे माझ्या संघर्षमयी ठिणग्यांनो
तुम्ही मिणमिणते दिवे व्हा...
काळोखाच्या गर्दराशी उन्मळुन
अलगद प्रकाशाची वाट कर्मलेल्या
या माझ्या आंतरिक निरामयी दिव्यांनो
तुम्ही ढणढणत्या मशाली व्हा....
स्वत्वाच्या अखंड शोधयात्रांच्या पथिकांना
स्वत्व जाळुन वाटदिशा धर्मिलेल्या
माझ्या आहुतमयी मशालींनो
तुम्ही धगधगते अग्निकुंड व्हा....
कारण
संगराच्या महायज्ञात
बलिदानाच्या समिधा अर्पण करत
महाभिषेक करणारा लवकरच
दुत तो तेजोत्तम सुर्यसुत
मी होणार आहे
फक्त तुमच्यासाठी......
By Vikas Rajendra Pisore

Comments