सारांश
By Vikas Rajendra Pisore
कधी प्रवाहाविरुद्ध पोहणं जमलंच नाही
रित आहे म्हणून त्यांच्याबरोबर वाहलो
तर त्यांनी तीरावर नेऊन सोडलं तडफडण्यासाठी.....
कधी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला उडणंही जमलं नाही
हीच आहे म्हणुन त्यांच्याबरोबर उडालो
तर त्यांनी क्षितीजावर नेऊन सोडलं फडफडण्यासाठी......
कधी समुहाविरुद्ध चालणं ही जमलं नाही
भीत आहे त्यांची म्हणून त्यांच्याबरोबर चाललो
तर त्यांनी शिखर शिरावर नेऊन सोडलं गडगडण्यासाठी......
आता मात्र पोहायचंय राजहंस होऊन
उडायचंय गरुडांश होऊन
आणि चालयचंय सारांश होऊन
अगदी एकटंच
स्वतः अर्थ लावण्यासाठी.....
By Vikas Rajendra Pisore

Comments