सागरकिनारा
By Atharva Arvind Andore
नखशिखांत न्हाऊन सागरात माझ्या भावनांना वाट फुटली,
किनारी तुझ्या मनाची ती रेती तरी कसली,
प्रेमशब्द माझे लाटेपरी आले तुझ्या मनाशी,
नयनांच्या कवेतली भाषा वसली माझ्या ह्रदयाशी,
तुझं शब्दांना भुलणं होतं की माझ्या नजरेला हे ना कळे मला,
सागरा किनारा मिळाला न उरे काही जगाशी..!!
By Atharva Arvind Andore

Comments