��शब्दवेडी ��
- Hashtag Kalakar
- Dec 2, 2025
- 1 min read
By Dr. Pradnya Vilas Darade
दुसऱ्यांच्या फंदात पडण्यापेक्षा,
शब्दांच्या छंदात रमावं म्हणते...!
दुसऱ्याच्या भल्या बुऱ्या बाह्यरूपावरून त्याचं मूल्यांकन करण्यापेक्षा,
स्वयम परिवर्तन करून स्वतःच्या
मनाचं आकलन करावं म्हणते,
सोन्याच्या दागिन्यांनी मढण्यापेक्षा,
शब्दालंकारांचाचं शृंगार करून घेते,
शब्दांमुळेच रुसवा आणि शब्दचं मनवतात, म्हणूनच
संत तुकाराम सुद्धा शब्दराग आळवतात,
शब्द हेचि तारक अन शब्द हेचि मारक,अन
अदभूत अशक्य चमत्काराचे शब्द हेचि कारक,
शब्दांवर प्रेम जडले अन मी झाले शब्दमय,
देवी सरस्वतीच्या आशीर्वादाने जीवन झाले माझे निरामय...!
By Dr. Pradnya Vilas Darade

Very Meaningful