व्हॅलेंटाईन डे
- Hashtag Kalakar
- Sep 28, 2024
- 1 min read
By Archika Bapat
व्हॅलेंटाईन व्हॅलेंटाईन म्हणून
प्रेम व्यक्त करतात
गुलाब आणि चॉकलेट ची
लयलूट करतात
मनातील गोष्ट सांगायला
खरच कुठला दिवस लागतो का
हृदयात जागा निर्माण व्हायला
व्हॅलेंटाईन दिवसच असतो का
मनांच जुळण आणि विश्वास
एवढच पुरेस असत
भावना व्यक्त करण्यासाठी
शब्दांचीच गरज असते
प्रेम ही एक भावना आहे
मनावर झालेला अलगद स्पर्श आहे
उमललेल्या फुलासारखा टवटवीत
अनुभव आहे
By Archika Bapat

Comments