विठ्ठलाची वारी
- Hashtag Kalakar
- Sep 28, 2024
- 1 min read
By Archika Bapat
विठ्ठलाच्या वारीला निघतात हजारो वारकरी,
टाळ, मृदूंगाचा ध्वनी पडतो आपुल्या कानी
भक्तीच्या रसात बेधुंद वारकरी,
विठ्ठल एकची नाम येते त्यांच्या मुखी
अभंग म्हणत म्हणत चालू असते वारी ,
भान हरपून जाते वारकऱ्यांची दिंडी
साद घालत विठ्ठलाला मागणे काही नाही
तुझ्या चरण स्पर्शाची आस असते मनी
By Archika Bapat

Comments