वादळवाट.....
By Vikas Rajendra Pisore
तुम्ही समजत असाल ती
तुमच्या फक्त भोवताल पानांची
सळसळ करणारी आल्हाद वाऱ्याची
झुळूक मी नाहिये.....
तुम्ही विचार करताय ती
तुमचं मतिमस्तिष्क गोठवणारी
वाऱ्याची थंड लहर तर मी
अजिबातच नाहिये....
तुम्ही भ्रमात असाल अशा
तुमच्या शक्ती सामर्थ्याची पताका
एकदिशेला फडकावणारी
वाऱ्याची धारा तर मी नाहियेच नाहिये....
म्हणुन
तुम्ही कितीही खलबतं करत बसा
तुमची गलबतं किनाऱ्याला लावा
अथवा भर समुद्रात घाला
पण अलबत
एकच शाश्वत आहे
तुमची सारी साम्राज्ये
उद्ध्वस्त करणारी
वादळवाट ती माझी असणारं आहे
हे मात्र नक्की.....
By Vikas Rajendra Pisore

Comments