“लग्नघटिका”
By Prasad Madhukar Shembekar
साक्षगंधाच्या दिवशी दोघे सर्व भेटले ते
घालमेल ती लग्नाचि दोघांच्या मनात ही कुतुहल जागे।।१।।
सरले दिवस बघता बघता आला दिवस तो मेहंदीचा
दोघांचे ही हात रंगलेत क्षणात एका बघता बघता।।२।।
हल्दीच्या या गोड गोडव्या नव्या स्वप्नांची चाल नवी
नव्या नवेल्या नवरीच्या या आयुष्याची वाट नवी।।३।।
सिमंतीच्या या थाटची काय सांगतो गोष्ट नवी
शालु अन शेरवानी च्या रंगाने दोघेही दिसतात सुन्दर भारी।।४।।
लग्नाची ही वेळघटिका जवळ आली आहे आता
लग्नाची ही वेळघटिका जवळ आली ऐका हो
आयुष्यभराच्या या नात्याला दोन्ही कुळाची गाठ नवी
नवे संबंध ऋणानुबंध आठवणीची जोड़ धरी
जशी जनू ही लग्न गाठ नवी ।।५।।
सात फेरे हे सप्तपदिचे सात जन्मांची भेट असे
म्हणूनी सांगितो ऐका सर्वे
मोठ्यांच्या या आशिर्वादाने सुखी संसार करावा तुम्ही।।६।।
By Prasad Madhukar Shembekar

Comments