येईल हा मी.
By KALPESH SITARAM AHIRRAO
तुझ्या सोबतीत तुझ्या वाटेवर आठवण घेऊन,
माझ्या नजरेत,माझ्या श्वासात तुझे अस्तित्व घेऊन,
पावसाच्या त्या सरींमध्ये,अलगद प्रेमाची झुळूक घेऊन,
तुझ्याच शब्दात,तुझ्याच हृदयात,आशेचं किरण बनून,
तुला ठाउक नसेलही पण येईल हा मी.
नात्यांच्या ह्या बंधनात आपलं प्रेम जपून,
माझ्या मनात असलेलं तुझ रूप घेऊन ,
तुझ्या बोलण्यात हरवलेला तो श्वास घेऊन,
माझ्या प्रश्नांमध्ये लपलेली ती उत्तर घेऊन,
तुला ठाउक नसेलही पण येईल हा मी.
तुझ्या पाउल वाटात माझ्या स्वप्नांची लहर घेऊन,
त्या झुकलेल्या नजरेत,प्रेमची बहर घेऊन,
तुझ्या प्रेमळ ओठी रुजलेल माझं गीत घेऊन,
तुझ्याच मिठीत तुलाच सोबत घेऊन,
तुला ठाउक नसेलही पण येईल हा मी.
By KALPESH SITARAM AHIRRAO

Comments