top of page

या जन्मावर, या जगण्यावर - By Sanjay Padmakar Kulkarni

Aug 17
4 min read

Written By: Sanjay Padmakar Kulkarni

Category: Essay

Competition: Poetry and Creative Writing Competition 2026

In the enriching essay "या जन्मावर, या जगण्यावर," Sanjay Padmakar Kulkarni, writing as Ya Janmawar, explores profound themes of life and death. This submission is part of the Poetry and Creative Writing Competition 2026 by Hashtag Kalakar. Through the narrative, Sanjay invites readers on a reflective journey, contemplating the fleeting nature of life and the inevitability of death, urging us to embrace every moment with gratitude and love.

About the Work

Sanjay Padmakar Kulkarni’s essay delves into the juxtaposition of life’s impermanence and the certainty of death. The narrative is woven with rich philosophical reflections, inspired by lyrics and personal insights. Through vivid imagery and introspective musings, the work challenges readers to cherish life's moments while acknowledging death as an inseparable companion, encouraging a life lived fully and meaningfully.

Ya Janmawar

Original Submission by Sanjay Padmakar Kulkarni

या जन्मावर , या जगण्यावर ,शतदा प्रेम करावे

संध्याकाळी ऑफिस चे काम आटोपून लोकल ने बांद्रयाहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ला निघालो होतो. शुक्रवार चा दिवस आणि वीकएंड असल्याने पुढे अर्थातच अमरावती एक्सप्रेस ने अकोला येथे प्रयाण करायचे होते. लोकल प्रवासात माहीम हुन एक आंधळा भिकारी बऱ्यापैकी रिकाम्या असलेल्या आमच्या फर्स्टक्लास च्या डब्यात चढला. हातात बासरी, फाटके पण नीटनेटके कपडे. अश्या व्यक्ती चटकन माझे लक्ष वेधून घेतात, , कारण ही मंडळी जन्मता: च संगीताचे ज्ञान घेऊन आलेली असतात व यांनी छेडलेले सूर नकळत आपणास जीवनाचे तत्वज्ञान शिकवून जातात. आणि झाले ही तसेच . त्या व्यक्तीने मुक्कदर का सिकंदर या चित्रपटातील महम्मद रफी यांनी गायलेलं गीत वाजवण्यास सुरुवात केली.

” जिंदगी तो बेवफा है एकदिन ठुकरायेगी , मौत मेहबुबा है अपने साथ ले कर जायेगी

मर के जीने की अदा जो दुनिया को सिखलायेगा ,वो मुकद्दर का सिकंदर जानेमन कहलायेगा”

या गीताचा इंग्रजी तील स्वैर अनुवाद कदाचित असा असेल

“ Life is unfaithful, someday it will betray of you, Death is your lover, it will take you along.

While at the doorstep of death , the one who to the world teaches the way to live…..

will be called a Conqueror of destiny.”

हे गीत माझे लहान पणापासून खूप आवडते आहे , पण या व्यक्तीच्या सुरांनी मला नकळत या गीतावर विचार करण्यास भाग पाडले . हो आणि गीत ही आहे तसेच , आयुष्यावर / या जीवनावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकास विचार करण्यास भाग पाडणारे .

आपण " या जन्मावर , या जगण्यावर शतदा प्रेम करावे " या मंगेश पाडगावकरांच्या गीताचे नक्कीच चाहते असाल , मी पण आहे. खरंच आयुष्य खूप सुंदर आहे. आयुष्यात यश अपयश , सुख दुःख हा ऊन सावलीचा खेळ सुरूच असतो सभोवतालचे सृष्टी सौंदर्य , आपली माणसं आपल्याला जगण्यातला आनंद देत असतात. रणरणत्या उन्हात क्षणभर मिळालेला गारवा हि आपली मरगळ , नैराश्य दूर करून नवीन उमेद व प्रेरणा देत असतो , आशा पल्लवित करत असतो. सतत येणाऱ्या अपयशाने न खचता याच अपयशातून प्रेरणा घेत प्रयत्न सुरु ठेवल्यास शेवटी यशाचा गोडवा निश्चित चाखायला मिळतो. आयुष्यातील संघर्षानंतर मिळालेला हा गोडवा स्मृती पटलावर कायम रेंगाळत राहून कटू स्मृती विसरण्यास भाग पाडतो. आणि हो म्हणतात ना, मानव जन्म इतक्या सहजासहजी मिळत नाही , म्हणून च मी सुद्धा नेहमी म्हणत असतो

" या जन्मावर , या जगण्यावर शतदा प्रेम करावे "

पण लोकल प्रवासातील अंजान यांच्या या गीताने मला आज विचार करण्यास भाग पाडले . जिंदगी ..जीवन ..हे खरंच बेवफा आहे ...कृतघ्न आहे ... असावे ..कारण एक दिवस हे च जीवन आपणास दूर करणार आहे , एकाकी सोडणार आहे, ठोकरणार आहे ...आणि मृत्यू मात्र मेहबुबा , प्रियतमा आहे कारण या एकाकीपणात तीच /तोच साथ देणार आहे , आपणास सोबत नेणार आहे .....अनंताच्या प्रवासाला...

हे गीत पुढे म्हणते की मरणाच्या दारी असताना जो जगण्याची कला जगाला शिकवतो तो च खरा सिकंदर ...भविष्याचा जेता ..कारण मेल्यानंतर भूतकाळ ठरून ही तो भविष्यात त्याची ओळख कायम ठेवतो

म्हणूनच आनंदात जगायचे तर या जगा दोन गीतांची सांगड घालून .....वर्तमानात जगताना या जगण्यावर उदंड प्रेम करा आणि घ्या जगून झकास sss आणि हो लक्षात ठेवा मृत्यूने तुम्हाला सोबत नेले तरी हे जग अजिबात थांबणार नाही आणि या जगाच्या लेखी तुम्ही भूतकाळात जाल ....

कवी भा.रा.तांबे यांनी म्हटलेच आहे

“ सूर्य तळपतील चंद्र झळकतील I तारे आपुला क्रम आचरतील II

असेच वारे पुढे वाहतील I होईल काही का अंतराय II “

म्हणूनच असे जगा कि भविष्यावर ही तुंम्ही जगलेल्या आयुष्याची छाप राहील , तुमच्या स्मृती जिवंत राहतील ..

म्हणूनच गीतकार अंजान वरील गीतात म्हणतात

“मर के जीने कि अदा जो दुनिया को सिखलायेगा

वो मुकद्दर का सिकंदर जानेमन कहलायेगा”

आणि मला ही म्हणावेसे वाटते की……..

“काम करो ऐसा की पहचान बन जाये, हर कदम ऐसा चलो की निशान बन जाये ,

यहा जिंदगी तो सभी काट लेते है , जिंदगी जिओ ऐसी की मिसाल बन जाये .”

क्या बात है

पाडगावकरांच्या " या जन्मावर " या गीतामधील शेवटच्या कडव्यामधील ओळी , कोणास ही न टळलेल्या या मृत्यूवर हसत हसत मात करण्याची शिकवण देऊन जातात आणि मौत रुपी मेहबुबा पेक्षा ही बेवफा जिंदगी किती श्रेष्ठ आहे हे सांगण्याचा प्रयत्न तर करत नाहीत ना ? आणि हो मला वाटते की त्यासाठी मृत्यू ची किंमत मोजायची तयारी ठेव असे ही सांगतात….. काय आहेत त्या ओळी

“ या ओठानी चुंबुन घेईन हजारदा ही माती

अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्या साठी “

माझ्या भाषेत म्हणाल तर “ऐसी अनगिनत मौत कुर्बान है इस हसीं जिंदगी पर”

जीवन अशाश्वत आहे तर मृत्यू अटळ . पण त्या अटळ मृत्यूच्या भयाने जीवनातील आनंद का गमवायचा ? , तर मुळीच नाही , जीवन आणिं मृत्यू , दोघांना योग्य न्याय द्यायचा

गीतकार इंदीवर यांनी म्हटलेच आहे

“ जिंदगी का सफर ये है कैसा सफर , कोई समजा नाही , कोई जाना नही ,

जिंदगी से प्यार हम ने बहोत किया , मौत से भी मोहब्बत निभायेंगे हम”

क्योकी मौत का दुसरा नाम मेहबुबा है

About the Competition

The Poetry and Creative Writing Competition 2026 by Hashtag Kalakar invites artists and writers to express their creative voices through poetry, essays, and creative writing. This esteemed platform celebrates diverse narratives and artistic expressions, fostering a community where creativity thrives and innovative ideas are shared.

We extend our heartfelt thanks to Sanjay Padmakar Kulkarni for his insightful essay "या जन्मावर, या जगण्यावर." As part of the Poetry and Creative Writing Competition 2026, his work enriches our understanding and appreciation of life's transient beauty. We are grateful for his contribution and reflection on themes that resonate deeply with all of us.

About Hashtag Kalakar

Hashtag Kalakar is a creative platform dedicated to providing artists, writers, singers and other creative talents with opportunities to showcase their work and reach wider audiences through competitions, features and creative initiatives.

 
 
 

Recent Posts

See All
Horizon - By Ruby-Rose

Written By: Ruby-Rose Category: Poetry Competition: Global Poetry and Creative Writing Competition 2026 We are delighted to feature "Horizon," a thought-provoking poem by Ruby-Rose, writing under the

 
 
 
Star Link - By Ruby-Rose

Written By: Ruby-Rose Category: Poetry Competition: Global Poetry and Creative Writing Competition 2026 Presenting "Star Link" by Ruby-Rose, showcased under the writing name Star Link. This evocative

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page