म्हातारपण
By Amol Kharat
ढवळ्यात सजलेले ,चेहरे मळलेले ....
बाक काढून निवांताच्या बाकात वाकलेले ....
हालचाली मंदावलेले ....
रेषांसारख्या डोळ्यांवरून त्यांनी कानात चष्मे खवलेले .....
तंबाखू चोळत ....झाडं ,भिंतींच्या सावलींचे अन मंदिराच्या वट्याला मालकी लावलेले .....
मरणा समोर मफलरीत गुंढाळलेल्या ताठ मानेने उभे ठाकलेले ....ते वय आणि अनुभवाने गळलेले पाय
निवांत आहेत ....त्या सावलीसारखेच, आयुष्यच उन्ह झेलून अंधाराची वाट बघत .......अगदी चारच्या चहा पासून ते सकाळच्या हरवलेल्या न्याहरीच्या जागेवरच्या चहापर्यंत ..
By Amol Kharat

Comments