top of page

मोरपंख

Sep 24, 2022
2 min read

By Dr. Snehal Gorde


दिवस रविवारचा.झोपेतून जागा होत तो बाहेर आला तेव्हा त्याने पाहिलं की त्याची मुलगी चित्रं रंगवत होती.तो तिच्या जवळ जाऊन बसला."बाबा मला हा peacock colour करून द्याल?"असं म्हणत त्या बाळाने एका मोराचं चित्रं त्याच्यापुढे धरलं.तिची मागणी पूर्ण करणं भाग होतं.त्याने ते चित्रं हातात घेतलं.ते चित्रं पाहून त्याला तिची आठवण आली.





तो - मला का दिला हा मोरपंख?

ती - असंच.आजच्या दिवसाची आठवण म्हणून.

तो - यात असं खास काय आहे ज्याने आठवण येईल.

ती - काहीच नाही.

तो - मग कशी येईल आठवण?आणि मी हा मोरपंख सांभाळू शकलो नाही तर?

ती - नाही तर नाही.पण मला एकही भेट अशी निरस जाऊ द्यायची नाही.प्रत्येक भेटीत काहीतरी असं असावं ज्याने ती लक्षात राहील.सध्या मी एवढंच करू शकते.

तो - म्हणजे तू मला तुला विसरु देणार नाही.

ती - मी तुला विसरणार नाही.आपण ठरवून एकमेकांच्या आयुष्यात आलो नाही.योगायोगाने म्हण किंवा त्या वेळी ते येणं ठरलेलं असेल म्हणून पहिल्यांदा आपण एकमेकांना भेटलो.आता आपण ठरवून भेटतो.आपण मनापासून इथे असतो.आणि यातली प्रत्येक गोष्ट कायमस्वरूपी खास व्हावी असा मला वाटतं.म्हणून हे छोटे प्रयत्न.तुझ्या लक्षात राहो न राहो पण माझ्यासाठी ते खास व्हावं म्हणून दिला.

त्याला ती भेट लख्ख आठवली.तिच्याशी बोलावंसं वाटलं.त्याने फोन काढला.त्यावर एक message टाईप केला आणि send करायच्या आधी तो थांबला.

माणसाला स्वतःच्याच मनाचं मोठं बंधन असतं.हे करू का? हे बोलू का? या प्रश्नांची उत्तरं आपल्याला स्वतःकडूनच कधी कधी मिळत नाहीत.त्यामुळे एखादा संवाद सुरू होण्याआधीच संपतो.भूत आणि वर्तमानाची सांगड घालावी की नाही या दोलायमान स्थितीत प्रत्येक जण असतो.भूतकाळ कोणत्या ना कोणत्या कारणाने अंतरंगात डोकावत असतोच.त्यात किती अडकायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो.त्यातून बाहेर पडणं काहींना जमतं.,काहींना नाही.पण पुढे जाणं भाग असतं.कारण काळाच्या चक्रव्यूहात आपण अडकलेले असतो.आणि काळ वर्तमानात जगायला शिकवतो.निसटून गेलेले क्षण पुन्हा मिळणं अशक्य.पण जे समोर आहे त्यात "जगणं" महत्त्वाचं.

"झालं का colour करून?" बाळाची आई कॉफीचा मग बाळाच्या बाबांच्या हातात देत बाळाजवळ बसली.कौतुकाने तो पसारा ती पाहत होती..भूत आणि वर्तमानाच्या मध्ये तो उभा होता.भूतकाळात रमणारा तो नव्हता.त्याने अलगद भूतकाळातून आपला पाय काढून घेतला. टाईप केलेला message delete केला.आणि आपल्या मुलीसोबत तिचं चित्र पूर्ण करू लागला.



By Dr. Snehal Gorde





Recent Posts

See All
Unread

By Roshan Tara “You’ve never written me a love letter,” she teased, eyes bright. “Like in old movies. Handwritten. Just once—for my birthday.” He promised. But fate was faster than his pen. She never

 
 
 
Teaming Up and Escaping From Kidnap

By Hemasri Nithya Chodagiri “I don’t know how I got myself here”. “I'm an ordinary orphan and my name is Henry”. “My dad raised me until I was 10 but after that my dad died in a museum fire and my mom

 
 
 
The First Sight

By Gaayathri Arasakumar “ Senapathi , move forward, come what may! Let no Deva or man stop us!” I bellowed over the chaos of the battlefield. Perhaps, Mallan had not heard my cry over the maddening t

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page