मोकळा श्वास
- Hashtag Kalakar
- May 17, 2024
- 1 min read
Updated: Oct 1, 2024
By Archika Mayur Bapat
कधीतरी सगळ सोडून
स्वच्छंद पणे जगावं
मनातल्या इच्छाना
मोकळ होऊन द्यावं
जबाबदारीच्या ओझ्यातून
अलगद दूर व्हावं
फुलपाखरा सारख मनमुराद उडाव
मोकळ्या हवेत मोकळा श्वास घेऊन
समुद्राच्या लाटांना अंगावर झेलाव
दोन दिवस स्वतः स्वतःसाठी जगावं
मित्रांच्या संगे बालपण अनुभवाव
By Archika Mayur Bapat

Comments