मृगजळ
By Vikas Rajendra Pisore
उजेडाच्या साम्राज्यात राहणाऱ्या
प्रभुतींचं काय ते नवल एवढं....
ज्यांच्या दिमतीला असतात
दिवे पणत्या पलिते आणि
मशाली नेहमीच.....
पण काळकुट्ट युगात खितपत
अभाग्यांसाठी असं पाठीशी
खंबीर असतं का कुणी कधी....?
हाच खरा प्रश्न आहे
कारण
ज्यांच मुळच मूलत: अंधारयात्री
त्यांच्यासाठी का उजळणारं मार्ग
आणि कोण पेटवणारं प्रकाशदिवे.....
ज्यांना फक्त दाखवलं जातं ....
दुरवरती मिणमिणतं एक मृगजळ
आशेच्या दिव्याचं अन्
देतात सोबतीला
तोच बदनाम अंधार त्यांच्यासाठी
त्यातच जळाया अन् उजळाया
नेहमीसाठी.....
अगदी मिटेपर्यंत......
By Vikas Rajendra Pisore

Comments