मी स्वतःलाच हरवून बसले....
Updated: Jul 15, 2025
By Saili Parab
जिभेवर माझ्या रेंगाळत होते नाव तयाचे,
बाकीचे शब्द सारे ओठांवरीच अडकले...
भेट होता आमची सारे जग थांबले,
फक्त तो आणि मी ऐसे दृश्य मला दिसले...
आभाळातूनी थंड वर्षाव सुरू झाला,
एकाच त्या भेटीत तो कायम लक्षात राहिला...
एकाच त्या जन्मी जणू, मी पुन्हा स्वतःला भेटले...
अन् पाहता त्याच्या डोळ्यात, मी स्वतःलाच हरवून बसले....
By Saili Parab

Comments