मी शोधले मला परत तुझ्याच प्रेमात.
By KALPESH SITARAM AHIRRAO
आतुर झाले हे मन,तुझ्या अबोल असण्यात ,
तुलाच शोधते हे मन,तुझ्या प्रेमात असण्यात,
अश्रूंना नेहमीच वहायचे होते तुझ्या शोधात,
तुला शोधले त्यांनी नेहमी माझ्याच काळजात.
तू अशीच रहा नेहमी,ह्या अबोल नात्यात,
मी शोधले मला परत तुझ्याच प्रेमात!
शब्द माझे नेहमी पानावले तुझ्याशी बोलण्यात,
तुझीच वाट पाहत असत,तुझ्या नसण्यात,
बोलणे माझे अबोल झाले तुझ्या सहवासात,
तरीही मन जुळले होते ह्या विसंवादात !
तू अशीच संवाद साध ह्या प्रेमळ नात्यात,
मी शोधले मला परत तुझ्याच प्रेमात!
बरीच वादळ येतीलही ह्या नात्यात,
जपशील नेहमी तू मला , हा विश्वास ह्या प्रेमात,
अशीच साथ तू दे मला,ह्या अबोल नात्यात,
मी शोधले मला परत तुझ्याच प्रेमात!
कधी हरवली जरी तू ह्या वादळात,
तरी नेहमी शोधेल मी मला तुझ्याच प्रेमात!
By KALPESH SITARAM AHIRRAO

Comments