माझ्या सावळ्या मनांत
By Dr. Amit Tanajirao Suryawanshi
माझ्या सावळ्या मनांत, तुझ्या प्रेमाचा प्रकाश
तुझ्या डोळ्यात मन उडे, आकाश आकाश
डाव चंद्राचा की तो, आहे चांदण्यांचा
त्यांच्या रुपात मी, तुला पाहण्याचा
सारे अवकाश तुझे, तुला सृष्टीचा सलाम
सारे ग्रह आणि तारे, परी तुझेच गुलाम.
By Dr. Amit Tanajirao Suryawanshi

Comments