माझी प्रेयसी
Updated: Oct 8, 2022
By AAKASH VILAS SALUNKHE
शब्द सुचेना मला जेव्हा तुला पहिले
मनात शहनाई अन ढोल वाजु लागले
बघत राहावं तुला अशी इर्शा झाली
तेव्हा तशीच संधी माझ्याकडे चालून आली
तिच्यासाठी काय करू मला काही कळेना
प्रेमात तिच्या पडलो मालाच माझे उमजेना
द्यायचं नव्हतं तिला हे कळून
नाहीतर बघणार नाही कधी माझ्याकडे वळून
तिच्याही मनात काही प्रेम जगू लागलं
माझ्या विनोदांवर तिला हसू यायला लागलं
विचार केला बोलायचं आता मनातलं
पण मन माझं नकारला घाबरलं
मित्र होते जास्त हुशार जे जवळ होते
ओळखलं त्यांनी जे माझ्या मनात होते
तिच्यासाठी माझी घालमेल त्यांना कळू लागलं
प्रेम माझ खर आहे हे त्यांनाहि पटू लागलं
एकदा ती माझ्या खूप जवळ आली
स्वप्नात माझ्या ती हळूच चालत आली
विचारलं आज कशी काय आली
त्यावर म्हणाली मी आपलं आयुष्य पूर्ण करायला अली
पुढे म्हणाली आपल्या मिलनाची हि वेळ आली
यासाठी अनेकदा संधी चालून आली
पण म्हणतात ना देव देतो आणि नशीब नेत
ठरलं होतं तुझ्याशी बोलायचं पण परीक्षेचं बंधन होतं
By AAKASH VILAS SALUNKHE

Comments