मनातील स्पंदने
By Urmila Hole
आठवण येता तुझी मन माझे हुरहुरते
चाहूल लागता तुझी मी नवे गीत गुणगुणते
क्षणात जवळ येतो,क्षणात दूर जातो
या भासात ही मन माझे वेडावते
वाऱ्या च्या वेगासवे मन माझे तुला शोधे
तू न गवसता मन माझे हीरमुसते
माझी पावले तुझी च वाट चाले
बघता तुला ओठी तुझे च गीत उमटे
वाटे मला तू मनकवडा होवूनी माझ्या मनीचे गीत गावे
तुझे गीत ऐकता ऐकता मी फुलपाखरू व्हावे
फुलपाखरू होवुनी मी स्वच्छंद उडावे
गीता सवे तू मला ओंजळीत घ्यावे
पण न कळे तुला माझी प्रीत, न कळे गीत
तरी पण मी तुझी च मित
तुझी माझी प्रीत जुळता जुळेना
माझ्या मनीचे गीत तू गाता गाईना...
By Urmila Hole

Comments