मन माझे
By Dhiraj Phadke
हरवले मन कसे, माझे तुझ्या-सवे,
आतुर मी जणू, स्वप्न पाहण्या तुझे.
गुंफून माळ ही,
प्रेम-गंध भरी,
वेड लावी जीवा,
स्पंदने वाढली;
जाऊ नको, दुरुनी पुन्हा, हातात हात दे,
स्वप्नातही जवळी रहा, बेधुंद होऊ दे.
येशील ज्या क्षणा,
माझ्याशी बोलण्या,
आठवू दे मला,
डोळे मिटुनी जरा,
सावज जसे, हेरून मनी, मागोवा घेतेस,
रात्रंदिनी व्याकूळ ते, मन हे वेडेपिसे.
पाण्यावरी जसे,
उठती तरंग ते,
स्पर्शामधे मला,
हरवूनी जाऊ दे,
फुलपाखरू अल्लडपणे फिरते इथे तिथे,
अलवार ठेव पाऊल तुझे टिपण्या नाजूक ठसे.
By Dhiraj Phadke

Comments