मन तुझीच वाट पाही.
By KALPESH SITARAM AHIRRAO
चुकली एक वाट माझी सोबत तूच नाही,
ह्रदय तुझ्या प्रेमाला नेहमी आठवून पाही,
आठवण येई तुझी हे सांगू की नाही?
ह्याच भीतीत साऱ्या हे माझे प्राण जाई.
प्रेमाशिवाय तुझ्या काहीच उरले नाही,
काळोखाच्या रात्रीस मन तुझीच वाट पाही.
नजरेला माझ्या तुझी नजर दिसे नाहीं,
हृदयाला माझी तुझीच आस राही,
ह्या क्षणात मला तू भेटशील की नाही?
एकट्या वाटेवर मन सारखे विचारत राही.
प्रेमाशिवाय तुझ्या काहीच उरले नाही,
वळणावर नेहमी हे मन तुझीच वाट पाही.
जगणे माझे सारे तुझ्यात उलगडत जाई,
विरहाच्या क्षणात तुझा आभास शोधून पाही,
श्वासांना माझ्या तुझी गरज भासत जाई,
तुझ्याविना सारे हे रोज घडत जाई.
प्रेमाशिवाय तुझ्या काहीच उरले नाही,
शांत होऊनी हे मन तुझीच वाट पाही.
By KALPESH SITARAM AHIRRAO

Comments