भ्रम - The Delusion
Updated: Jul 16, 2025
By Shivam Namdeo Shinde

भ्रमात माझ्या भ्रमास मी हे,
भ्रमातले अभ्रम दावले,
भ्रमातल्या त्या भ्रमाने मग ते,
भ्रमअभ्रम संभ्रम सोसले.
भ्रमात तुही, भ्रमात मीही,
भ्रममय हे जग भोगत आलो,
भ्रम मग होऊन तुझिया भ्रमाने,
भ्रमानुभूतीचा भ्रमर मी झालो.
By Shivam Namdeo Shinde

Comments