बाप बाप होता है
- Hashtag Kalakar
- 3 days ago
- 1 min read
By Vasucha Vasu
मी एका कीर्तनात ऐकल होत कि बाप आणि मुलाच चंद्र आणि सूर्याच नात असतं. एक मेकांच पटत नाही, बाप घरी आला कि मुलगा बाहेर जातो आणि बापाची बाहेर जायची वेळ झाली कि मग मुलगा घरी येतो. रात्री झोपतील तेवढेच काय ते एकत्र अस सांगताना त्या कीर्तनकाराने हे उदाहरण दिलेल. ते काही औंशी खर आहेसुद्धा. आणि मला अस वाटत कि ह्यातील जो चंद्र आहे तो मुलगा आहे आणि जो सूर्य आहे तो बाप. चंद्राला जे काही सौंदर्य लाभलेलं आहे, त्याचा जो काही मंद प्रकाश आपण रात्री अनुभवतो, तो जेवढा आपल्याला हवासा वाटतो तो केवळ आणि केवळ त्या सूर्यामुळेच. ज्याप्रमाणे सूर्याच्या प्रकाशामुळे चंद्राचे अस्तित्व आबाधित आणि मोहक आहे अगदी त्याप्रमाणे बापाच्या बोलण्यात, रागवण्यात, समजून सांगण्यात कधी कधी मारण्यातसुद्धा मुलाच भलंच असत. ह्यात कोणत्याही प्रकारच्या हिंसेच समर्थन नाही पण, ज्याप्रमाणे पौर्णिमेच्या चंद्राला सूर्यप्रकाश्यामुळे पूर्णत्व प्राप्त होत त्याप्रमाणे बापाच्या बोलण्यामागचा हेतू लक्ष्यात घेतला तर मुलांच्या प्रत्येक गोष्टीसुद्धा पूर्णत्वाला नक्की जाऊ शकतात. व ज्याप्रमाणे अमावस्येला चंद्र पूर्णपणे सूर्याच्या किरणापासून अलिप्त असतो त्यावेळी त्याच अस्तित्वच आपल्याला जाणवत नाही, तो असूनसुद्धा नसल्यासारखाच असतो, अगदी तसच बापाचा सल्ला नसेल, त्याच मार्गदर्शन नसेल, शिकवण नसेल तर मुलाच सुद्धा अस्तित्व असून नसाल्यासारखच...
By Vasucha Vasu
Comments