बचत, प्रत्येकाची जबाबदारी…!!
By Anjali Sameer chimrukiar
दोन्ही करांनी करूया बचत, धरूया नवा संकल्प...
कशी करावी बचत विचार करून, सुरू करू नवा प्रकल्प...
वाचवूनी नैसर्गिक संपत्ती...
टाळूया जीवनाची आपत्ती...
तोड फोड थांबवून झाडांची...
नासधूस थांबवून अन्नाची...
साठवणूक करूया सौर ऊर्जेची....
बचत करूया विद्युत ऊर्जेची....
नको ती वस्तु घेण्याचा थांबवावा नाद...
दमडी दमडी वाचवावी, नको नसता उन्माद...
प्रदूषण मर्यादित करण्यासाठी, कमी करावा इंधनाचा ऊपयोग...
कधी चालावे पायी, कधी करावा सायकल चा प्रयोग...
वेळेची करावी बचत, हेच यशस्वी आयुष्य जगण्याचे प्रयोजन....
क्षण क्षण वाचवावा, करून वेळेचे योग्य नियोजन....
सर्वात श्रेष्ठ, बचत पाण्याची...
थेंब थेंब वाचवू, निशाणी संपन्नतेची...
By Anjali Sameer chimrukiar

Comments