प्रेमाच्या वाटेवर
By Dhiraj Phadke
अल्लड वार्याने या, पाने अंथरली,
पानगळीने वेडी, धरणी शहारली,
चल जाऊ पुन्हा, वळुनी बघु,
काय झाले मनाला बरे
कसे पण्यावरती आज, तरंग दाटले,
मिलनासाठी मग हे किनारे एकवटले,
तू ये जरा, फिरुनी शोधु,
आपुले पाऊल ठसे,
वाटेवर...हो..वाटेवर... प्रेमाच्या वाटेवर.
अंधुक सावल्या, मजल्या भावल्या,
सांजवेळच्या या कळ्या कोमेजल्या,
खोडी काढून तुझी आज,
मन देता ओली गूढ साद,
उधळेन मी, सोन्यापरी हा गुलाल हर्षाचा,
वाटेवर...हो..वाटेवर... प्रेमाच्या वाटेवर
अलगद स्पर्शामधे, हिरवळ दाटली
बासरीमधूनी जशी, सरगम उमटली
मिटुनी पापण्या, एका क्षणात
बिलगुनी तव हातात हात
आतुर मी, तुझ्यासवे करण्या दरवळ गंधाची
वाटेवर...हो..वाटेवर... प्रेमाच्या वाटेवर.
By Dhiraj Phadke

Comments