प्रेमाचा क्षण
By Aishwarya Deo
प्रेमाचा एक क्षण
मोगऱ्याच्या सुगंधाचा
मेघांचा पलिकडल्या
दुनियेतील रंगाचा
खुलून हसताना
गालावरच्या खळीचा
हळुच लाजताना
झुकलेल्या पापण्यांचा
कडाडल्या थंडीतल्या
थरथरणार्या ओठांचा
हव्याहव्याशा वाटणाऱ्या
उबदार स्पर्शाचा
मेघाच्या गर्जनेने
घाबरलेल्या मनाचा
बिथरलेल्या हृदयाला
सावरणाऱ्या मिठीचा
पवित्र अग्नी भोवती
घेतलेल्या वचनाचा
गुलाबाने नटलेल्या
प्रेमाच्या रात्रीचा
असा हा आयुष्यातला
एक क्षण प्रेमाचा
By Aishwarya Deo

Comments