प्रेमपाऊस
By Atharva Arvind Andore
पावसाच्या सरीत तुज शोधतो मी,
गंधाळलेला वारा जणू तुझा पाठलाग करी,
त्या धुक्यातून तुझी आकृती दिसे मज जणू चित्रकाराची कलाच ती,
दृष्टीपलीकडचं तुझं अस्तित्व मज क्षणोक्षणी घायाळ करी,
तू ये तरी पुढ्यात माझ्या तुला नजरेत भरायचंय,
पाहूनि डोळ्यांत तुझ्या मज आज प्रेमात पडायचंय..!!
By Atharva Arvind Andore

Comments