प्रत्यंचा
By Vikas Rajendra Pisore
रोजच्याच काळोखी रात्रीला
किर्र अंधाऱ्या काळकुट्ट धारदार
माळावरच्या टेकडीवर भय उजेड पातीला
रातराणी गंधाळलेल्या जिवंतपणा भंजाळलेल्या
झाडाच्या बुंध्याशी भार पेलत खांद्याशी
पिसं मुकुटमस्तकी असलेला
सुवासिक चंदनसाल कंबरी
कवडमाळ गळा झुलवी
राजबिंडा एक राजसुकुमार
एकटक नजर लावत बसलेला
लख्ख चांदण्याच्या उजेडात
आभासी विश्वात वाट पहात
त्यात सौख्य मिरवणारा डोंगराएवढा
पण भळभळत्या जखमा दर्शवत
डागाळलेला चंद्र साक्षीला तहात
अखेर
कित्येक तपांची प्रतिक्षा भंगली एका क्षणात
गदगदलेल्या कंठरुपी धनुष्याच्या दोरीला
रक्ताश्रुंचा बाण अन् त्याच्या टोकाला
भळभळत काळीज खोचत
सरसावली हाती धनुष्यकमाण
फुलणारा श्वास रोखत अर्पणासाठी
अन् खेचली अखेरची प्रत्यंचा त्याने
परिनिर्वाणासाठी.......
By Vikas Rajendra Pisore

Comments