पावसाळा
By Pooja Kole
पावसाचे कोण जाणे काय आहे गुढ.. नभालाही लागते का मातीचीया ओढ.. काळ्या काळ्या ढगातल्या शुभ्र धारा बोलती. पुरे झाली कैद ढगा अता आम्हां सोड की...
मग पावसाने भिजता अंगणातली माती. येतो सुगंध जो असे अत्तराहूनही सुवासी. अश्यातच अचानक येता ऊन पावसात. आभाळाच्या कागदावर सप्तरंग उमटतात.
By Pooja Kole

Comments