पाठीशी
- Hashtag Kalakar
- 8 hours ago
- 1 min read
By Mohini C Halarnkar
स्वामी माझे असता पाठीशी
तमा मला कशाची ?
हवे तुम्हा ते गेलात घेऊन
कशी दाखवू घालमेल मनाची ?
खडतर माझा प्रवास आता
परी हाक तुम्हा मारिते l
तुम्हीच म्हणता स्वामी समर्था
विधीलिखितात माझी ढवळाढवळ
नसते l
दिधले बळ ते तुम्हीच मजला
पुढे पुढे जायचे l
कष्ट मज ते होती बहू
परी आहे तुमच्याच वचनात जगायचे l
तुम्हीच म्हणता माझ्या समर्था
भिऊ नकोस मी आहे पाठीशी l
हेच वचन हृदयात ठेवुनी
चालते मी अविरत दाखवीत खुशी l
By Mohini C Halarnkar

Comments