नात्यांमधील गुपित
By Anjali Sameer Chimurkar
नातं कुठलंही असो, ते निभावताना प्रत्येकाने एका वैयक्तिक पातळीवर एक गोष्ट जर नेहमी लक्षात घेतली आणि त्याचे कटाक्षाने पालन केले तर कुठल्याही नात्यात कधीच दुरावा येणार नाही.
प्रत्त्येक नात्यात एक सौंदर्य आणि एक वेगळेपण असतं. गरज असते ते वेगळेपण समजून घेऊन अचूकपणे जपण्याची आणि त्या नात्यातलं सौंदर्य अनुभवण्याची.
कारण प्रत्येक व्यक्ति त्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे किवा संस्कारा प्रमाणे देत असतो, जर घेणाऱ्याने ते जसेच्या तसे स्वीकार केले, कुठलीही अपेक्षा न ठेवता आणि अहंकार न बाळगता तरच योग्य प्रकारे संतुलन साधल्या जावू शकते.
कारण जिथे अपेक्षा येते तिथे नात्यातला गोडवा संपून जातो आणि एक भिंत उभी राहते.
दोषांकडे न बघता एकमेकांच्या गुणांचा आदर केला तसेच भावना समजल्या, सांभाळल्या तर प्रत्येक नातं अगदी नेहमी साठी फुलू शकेल आणि कधीच कोमेजणार नाही.
By Anjali Sameer Chimurkar

Comments