नवसुर्य.....
By Vikas Rajendra Pisore
विचार तुझ्या असण्या नसण्याचा नाहीच
ना मी दुर म्हणुन तु जवळ असण्याचा
ना मी स्थिर म्हणून तु फिरस्ती असण्याचा
ना मी प्रखर म्हणुन तु सौम्य असण्याचा
ना मी अमर म्हणुन तु नाशवंत असण्याचा
प्रश्न होता फक्त माझा उदय होण्याचा
तांबट पिवळसर लालभडक ज्वाळांतुन अग्निफुले
वसुंधरेच्या कुशीत सडा शिंपडत उमलावी
आणि स्वर्ण कोमल किरणांनी महाअरुला वर्ख देत
पहाटेला ही तुझं स्वप्न पडावं
इतका तेजोमयी तुझा उदय
जीवजंतूचा आधार तु सुर्य असेल
पण अज्ञान अंधाराच्या पाताळात बंदिस्त
दीनदुबळ्या जनांसी मुक्ततेच्या मशाली पेटवत
एल्गाराचा विवेक देत मानवतेला ही माझं स्वप्न पडावं
इतका ज्योतिर्गमयी माझा उदय
उद्धाराचा नवसुर्य होईल......
By Vikas Rajendra Pisore

Comments