नरेंद्र दाभोळकर
By Amey kshirsagar
बहुदा दाभोळकर जन्मानी अन कर्मानी दोन वेगळ्या जातीचे धर्माचे असावेत...
कारण ज्या जाती धर्माचे ते जन्मानी होते त्याचे एक तर राजकीय वजन शुन्य असेल आणि पुढे जावून त्याच जातीचे लोक,धर्मरक्षक, आपण एक झालं पाहिजे, संघटीत झालं पाहिजे म्हणत, त्याचांच जातीच्या दाभोलकरांना अत्यंत चुकीचा मुद्द्यावरून अत्यंत आक्षेपार्ह पद्धतीने झोडपत होते..ते हि अगदीच बालिश असा बचाव मांडत… थोडक्यात काय तर संघटीत व्हा म्हणणारे स्वताला किवा त्यांचा तथाकथित अनुयायांना फसवत होते अन आहेत..
बाकी दाभोळकर कर्माने ज्या जातीचे होते ती जात म्हणजे "माणूस"..!! ही जात अशीही समाजात विरळा! न राजकारणात तर अगदी अस्प्रुश्यच अन पूर्णपणे लोप पावलेली..!! त्यामुळे त्याच्या विचारांना राजाश्रय मिळण्याचा तर प्रश्नच येत नाही..ते निव्वळ अशक्य..त्यामुळेच बहुतेक मराठा, लिंगायत, धनगर, ब्राम्हण, मुस्लिम OBC वगैरे आरक्षणावर तावा-तावाने भूमिका मांडणारे प्रसंगी गडबडीने पत्रकार परिषदा घेणारे तथाकथिक सर्वच राजकीय पक्षांचे नेते १ वर्ष पूर्ण झालं तरी त्यांचा हत्ये बद्दल चकार शब्द काढत नाहीत..
पुढे जावून अशाच प्रसंगीच जागे होणारे मी अन माझ्या सारखे थोर-थोर विचारवंत यानीच या राजकारण्यांना एव्हडं मोठं LARGER THAN LIFE केला असतं हे मात्र अत्यंत सोयीस्करपणे विसरतो.. अस काही झालं कि चार अर्वाच्च शिव्या हासडतो न आपापल्या कामाला लागतो.. बरं आमचा पण युक्तिवाद तसा अगदीच चुकीचा नसतो असा आम्ही न आमचा आजूबाजूच्या लोकांनी करवून घेतलेला अन दिलेला समज.. आम्हाला जगण्याचाच संघर्ष एव्हडा मोठा कि, "कुठे या उरलेल्या बाबींमध्ये लक्ष घाला?" असं म्हणून आम्ही बाजूला..!!
कदाचित म्हणूनच असेल, आयुष्यभर अंधश्रद्धेच्या विरोधात लढलेल्या या गांधीवाद्याला (विवेकवादी म्हणा ज्यांना गांधी या शब्दाबद्दल आक्षेप असेल त्यांनी) आपला मुद्दा मांडताना अन पटवताना स्वताचा नरबळी द्यावा लागला..!!!
येणाऱ्या पिढ्या अन इतिहास अशा तथाकथित धर्म-रक्षकांना, राजकारण्यांना , आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे अशा मेलेल्या समाजाला कधीही माफ करणार नाही..!
By Amey kshirsagar

Comments