नयनपत्र
By Atharva Arvind Andore
माझ्या शब्दांनी गुंफलेल्या वाक्यात तुझ्या असण्याचा गंध असा दरवळला,
नकळत तुझ्या नयनांना माझ्या शब्दांचा पत्ता सापडला,
पत्र होतं ते तुझ्याचसाठी परी मी नाव तुझे विसरलो,
स्वतःचीच ओळख विसरता मी नयनांत तुझ्या हरवलो.. शोधता तुला पुन्हा मला माझेच शब्द सापडेना,
शब्दांचा तो गंध कुठला मलाच माझे समजेना,
नयनांची ओळख मात्र जरूर लक्षात ठेवेन मी,
नजरेनेच तुला कधी पुन्हा पत्र लिहीन मी..!!
By Atharva Arvind Andore

Comments