न बोललेले शब्द
By Manisha Nandgaokar
ते शब्द जे बोलायला धाडस होत नाही
ते शब्द जे नेहमी योग्य वेळेची वाट पाहतात
ते शब्द जे मनात राहून सतत त्रास देतात
सतत बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतात
ते शब्द जे कोऱ्या कागदावर नसतात पण डोळ्यांना दिसत असतात
ते शब्द जे कागदावर उतरतात पण ते कागदावरच राहतात
ते शब्द जे मेसेज मध्ये टाईप होतात पण ड्राफ्ट मध्येच राहतात
ते शब्द जे मेसेज मधून send होतात पण वाचण्याआधीच delete होतात
ते शब्द जे प्रत्येकाच्या मनाला भार देऊन असतात
ते शब्द जे भीतीच्या आगीत उकळत असतात
ते शब्द जे गैरसमज दूर करू शकतात
ते शब्द जे समजल्यावर नाती तोडू शकतात
ते शब्द जे विरहाला पूर्ण विराम देऊ शकतात
ते शब्द जे विरहाची सुरुवात करू शकतात
ते शब्द जे नवीन आयुष्याला भेटवू शकतात
ते शब्द जे रोज होणाऱ्या भेटीला थांबवू शकतात
ते शब्द जे व्यक्त करायचे असतात
पण प्रत्यक्ष यायला नकार देत असतात
दिवस, आठवडे, महीने तर कधी वर्ष सरतात
पण ते शब्द इच्छित व्यक्ती पर्यंत पोहोचत नसतात
न पाठवलेला मेसेज
न पोहोचलेलं पत्र
न उघडलेलं सत्य
न मारलेली हाक
न दिलेली शाबासकी
न साजरा केलेला आनंद
न दिलेली भेटवस्तू
न सांगितलेलं स्वप्न
न विसरलेल्या आठवणी
न दाखवलेली नाराजी
न मागितलेली माफी
न करून दिलेली जाणीव
न मारलेली मिठी
न जाणवलेला स्पर्श
न झालेली भेट
न दाखवलेली इजा
न व्यक्त केलेलं प्रेम
व्यक्त होणे फार गरजेचे असतात
न बोललेले शब्द................
(Translation in English on next page)
The Unspoken Words...
The words we don’t dare to say
The words that always wait for the right time
The words that haunt the mind constantly
The words those trying to come out
The words those are not written on the blank paper but visible
to the eyes
The words that are written on paper but stay on paper
The words that are typed in the message but remain in the draft
The words that are sent by the message but are deleted before
read
The words that weigh on everyone’s mind
The words that simmer in the fire of fear
The words that can clear up misunderstandings
The words that can break relationships when understood
The words that can put a full stop to the sadness
The words that can start frenzy
The words that let someone meet a new life
The words that stop a daily conversation
The words that are meant to be expressed
But they refuse to come out from inner mind
Days, weeks, months and sometimes years go by
But those words don’t reach the intended person
An unsent message
An undelivered letter
The untold truth
An ungiven call
An undone compliment
An uncelebrated joy
An ungiven gift
An unspoken dream
An unforgotten memory
An unexpressed disappointment
An unsolicited apology
An undone realization
An ungiven hug
An unfixed meet
An unfelt touch
An unspecified injury
An unexpressed love
Very important to be expressed
The unspoken words...
By Manisha Nandgaokar

Comments