देणगी परमेश्वराची
By Anjali Sameer Chimurkar
प्रत्येक व्यक्ति त्याच्या त्याच्या जागेवर अगदी परिपूर्ण असतो त्यामुळे कधी कुणासोबत तुलना करणं हे निष्फळ असतं.
कारण तुलनेतून स्पर्धा निर्माण होते आणि त्यातूनच तिरस्काराची भावना जन्माला येते, इथेच आयुष्यातला सगळा सार गमावून जातो.
परमेश्वराने प्रत्येकाला काहीतरी योग्यता प्रदान केलेली आहे, ती स्वतःतली योग्यता शोधून योग्यप्रकारे जोपासण्याची आणि आयुष्याचं सोनं करायची आपली जबाबदारी असते.
ती जवाबदारी अचूकपणे पार पाडण्याकडे प्रत्येकाची धडपड असायला हवी.
इतरांच्या गुणांचा आदर करून, स्वतःच्या गुणांची योग्यप्रकारे जोपासना करणे यातच आयुष्यातला सगळा सार दडलाय.
यानेच अहंकाराची भावना दूर होऊन स्वमान जागृत होऊ शकेल.
आणि खरंच, परमेश्वरालाही आपल्याकडून हेच हवे असेल.
परमेश्वराने आपल्याला प्रदान केलेल्या गुणांचा योग्य ऊपयोग करून समाजाला कुठल्यातरी स्वरुपात ते परत करणे आवश्यक आहे, जर आपण तसे केले नाही तरी आपण कायम त्या विधात्याचे ऋणी असू.
By Anjali Sameer Chimurkar

Comments