top of page

तो आणि ती

Jan 7, 2023
2 min read

By Amit Vijay Jadhav


रात्रीचा एक वाजला होता. ”ती” जागी होती..एक टक खिडकीतून आत येणाऱ्या, रस्त्यावरच्या त्या रात्रभर जागरण करणाऱ्या, इलेक्ट्रॉनिक दिव्याच्या प्रकाशाकडे बघत. ती पलंगावरून उठली आणि विखुरलेल्या केसांनी खिडकीत उभी राहिली. वारा तिच्या केसांशी खेळत होता. पण ती मात्र त्याच्या बोचऱ्या गार स्पर्शाला प्रतिसाद देत नव्हती. तिची नजर कोणाला तरी शोधतं होती. कोणाची तरी वाट बघत असावी. पण ती व्यक्ती मात्र येईल? याची चिन्ह दिसत नव्हती. अचानक तिच्या आसवांचा बांध फुटला आणि इतक्या वेळ डोळ्यात साठवून ठेवलेली आसवं घडा घडा वाहू लागली... आणि त्याचा फोटो छातीशी कवटाळून ती हुंदक्यांची माळ गुंफून रडत होती. पण आता तो येणार नव्हता. तिचे अश्रू पुसणार नव्हता.कारण “तो” तिच्यासोबत नव्हता, “तो” आता या जगात नव्हता.!


“ती” पुन्हा आत आली. आणि सरळ आरशासमोर उभी राहिली. तो आरसा,ज्यात तिच्या आणि त्याच्या आठवणी, तिने गोठवून ठेवल्या होत्या. ज्यात “ती” स्वतःचा शृंगार सावरत असताना, “तो” हळूच मागून येऊ, तिच्या कमरेत हात घालून तिला स्वतःकडे ओढून,तिच्या कानात "तुला कोणाची नजर नको लागू देत ग!", असे म्हणून स्वतःच्या हाताने काजळाचा एक टिक्का तिच्या मानेखाली बोटाने लावत असे. त्यावेळेस अनेकदा तिचे डोळे आनंदाने भरून येत असत. कदाचित त्या आरशाचीच नजर लागली असावी... “ती” पुन्हा त्या आरशाकडे बघत उभीं राहिली. त्या आरशात, “ती” त्याला शोधत होती.





पण तिला दिसली ति “ती”, जी तिला कधीच आवडत नव्हती...तिच्या कपाळावर कुंकू नव्हते, हातात बांगड्या नव्हत्या, ज्यांचा आवाज ऐकून तो तिच्याकडे धावत यायचा. सारा शृंगारच तिच्यावर रुसला होता. ती पुन्हा रडू लागली. जीवाच्या आकांताने ओरडू लागली. त्याच्या नावाचा धावा करू लागली.. नियतीवर चिडली. पण आता त्या ग्रहण चढलेल्या घरात तिला पौर्णिमेचा चंद्र दाखवणारा कोणी नव्हता. तिला कोणी समजावणार नव्हता. तिची चिडचिड समजून घेऊन त्यासाठी "सॉरी बाळा" असा बोलून उठाबशा काढणारा कोणी नव्हता. कारण आता तो नव्हता,तो आता तिचा नव्हता!


घड्याळाचे ठोके पुन्हा जोरात पडू लागले. चार वाजत आले होते आता. आता ति शांत होऊन बसली होती. तिने डोळे पुसले आणि ती पलंगावर डोकं ठेवून पडली. थकवा आणि झोप दोघांनी हि तिच्या शरीरावर ताबा मिळवला होता. “ती” झोपू लागली. अचानक कोणीतरी समोर आले. तिचे डोळे नीट उघडत नव्हते. पण तो परफ्युम ओळखीचा होता, तो शरीराचा बांधा ओळखीचा होता. ते शरीरचं ओळखीचं होत. "तो" तोच होता. आत्मा होऊन आला होता. तिच्या डोक्यावर हात फिरवत होता. तिला स्वतःची काळजी घेण्यास सांगत होता. स्वतःच्या डोळ्यातील अश्रू कसेतरी सावरत होता. हळूच मान खाली करून त्याने तिच्या कपाळाचं चुंबन घेतलं आणि त्यांच्या होणाऱ्या बाळाची काळजी घेण्यास सांगत होता. खूप बोलत होता... कदाचित यापुढे येणार नव्हता. तिला हसण्यासाठी स्फूर्ती देत होता. तिला त्याच्याविना जगण्यास शिकवत होता. “तो” तिच्यासोबत यापुढे भौतिकरीत्या नसणार हे सांगत होता, समजावत होता. “ती” डोळे उघडायचे यत्न प्रयत्न करत होती... पण डोळे उघडत नव्हते आणि तिला त्याला शेवटचे पाहता येत नव्हते. तोच तिला पुन्हा झोपण्यास सांगत होता आणि “लवकर उठत जा ग..”,”वेळेत जेवत जा..”, हे बोलताना त्याचा गळा दाटून आला होता...”मी जातो”, अस बोलून तो आता निघाला होता. “तो” आता तिच्यासोबत असणार नव्हता.... पण तिला जगण्यास सांगत होता. त्याला जाताना पाहून “ती” झोपेतच ओरडली.... मेजर…! आज नको जाऊस! आज शेवटचं थांब ना.!


By Amit Vijay Jadhav




Recent Posts

See All
Unread

By Roshan Tara “You’ve never written me a love letter,” she teased, eyes bright. “Like in old movies. Handwritten. Just once—for my birthday.” He promised. But fate was faster than his pen. She never

 
 
 
Teaming Up and Escaping From Kidnap

By Hemasri Nithya Chodagiri “I don’t know how I got myself here”. “I'm an ordinary orphan and my name is Henry”. “My dad raised me until I was 10 but after that my dad died in a museum fire and my mom

 
 
 
The First Sight

By Gaayathri Arasakumar “ Senapathi , move forward, come what may! Let no Deva or man stop us!” I bellowed over the chaos of the battlefield. Perhaps, Mallan had not heard my cry over the maddening t

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page