ते दिवस……..
- Hashtag Kalakar
- Nov 24, 2022
- 2 min read
By Ankita Raut
माणसाच्या आयुष्यात चांगले वाईट असे सगळे दिवस येतात.माणूस काहीतरी स्वप्नं बघतो स्वतः साठी आपल्या परिवारासाठी आणि ते स्वप्नं पूर्ण करण्या साठी करत असलेली तडजोड म्हणजे आयुष्य…….
आता आयुष्य म्हटलं की चांगले वाईट दिवस आलेत…असेच वाईट दिवस जे सगळ्यांवर आलेत मागच्या काही दिवसात ते म्हणजे कोरोनाचे दिवस…….
अगदी गोरगरिब माणूस असो वा श्रीमंत,सगळे अगदी होरपळून गेलेत.आपले जे काम अगदी नीट चालले होते ते अगदी एका रात्रीत बंद झाले.आपले काम थांबले.रस्ते सूनं झाले.आज जे आपले ऑफिस मधली आपले साथीदार,मित्र दिसतात ती उद्या दिसतील की नाही असा प्रश्न निर्माण करणारे ते दिवस. माणसाने आपल्या जवळच्या माणसाला अखेरचा श्वास घेताना बघितले.कोणी आपले आई बाबा गमावले तर कोणी आपले मुले.आपल्याला आपल्याच परिवाराला ह्या आजारातून दूर ठेवायचे असेल तर आपल्याला त्यांच्या पासून दूर राहावं लागेल असा हा आजार…
नाण्याला नेहमी दोन बाजू असतात एक जशी वाईट तशी चांगली.अका बाजूला जरी माणसं दगावत होती,परिवार उध्वस्त होत होती तरी “मृत्यूला सांगावं ये कुठल्या पण रूपाने,पण जोपर्यंत माझ्याकडे जगण्यासारखा काहीतरी आहे तोपर्यंत तुला दरवाजा बाहेर राहावं लागेन” असे विचार करणारे आणि मृत्यूशी जुजं देऊन जिंकणारे पण लोक होती.
आधी आपल्या घराच्या बाजूला कोण राहता आपल्या बाजूचा माणूस जगतो की मरतो हे माहीत नसणारे आम्ही आता अक दुसर्याच्या मदतीला धावून जायला लागलेत.एकमेकांच्या आयुष्यात फूल नाहीतर फुलाची पाकळी बनून मदत करायला लागलो.आपल्या परिवार च नाही तर समाजाला कसा मदतीचा हात बनून राहता येईल ते बघायला लागलो दुसऱ्या आयुष्यात केवडाचे फूल बनून सुगंध दरवळला लागलो.
“ एक मेकास साह्य करू अवघे धरू सुपंथ” असा एक नवा समाज नव्यानं जन्म घेताना दिसू लागला.
शेवटी इतकेच मागे वळून बघताना जसे ते दिवस आठवतात तेव्हा आता आपण अका नव्या समाजात नव्या हिमतीने नव्या ताकदीने पाऊल टाकतोय आणि परत एकदा आयुष्याच्या ती विस्कटले घडी परत एकदा बसवतोय हेच खरे कारण मॅच अजून संपलेली नाही कारण मे अजून जिंकले नाही……
By Ankita Raut

Comments