तुझं माझ, हे प्रेम.
By KALPESH SITARAM AHIRRAO
प्रेम तुझ नि माझ ,दोघांना आपलंसं करणारं,
हातात सोबती घेऊन ,सहवासात चालणारं,
आपल्या आठवणींना दररोज साठवून ठेवणारं,
तुझ्या स्पर्शात सारं जीव गुंतवून टाकणारं.
हे प्रेम, थोड्या भितीसाठी का विस्रावं?
वेळ देऊनी थोड एकमेकांना समजावं!
क्षणांना नेहमीच मोहून टाकणारं,
दोघांच्या नजरेत वेगळेच तेज आणणारं,
दुःखांच्या क्षणात सोबत अश्रू टिपणारं,
तू माझी, मी तुझी काळजी घेत जगणारं.
हे प्रेम ,भविष्यातील चिंता घेत का सोडावं?
वेळ देऊनी थोडा एकमेकांना जपावं!
रस्ते सोबतीची नसताना सोबत असणारं,
गरज लागल्यास एकदुसऱ्याची साथ देणारं,
वेळ नसतानाही मी तुला ,तू मला ,वेळ देत येणारं,
एकत्र जगण्यासाठी नेहमी प्रयत्न करणारं.
हे प्रेम,भावनांचा विचार करत का माघारी घ्यावं?
वेळ देऊनी ,ह्याच भावनांना परत प्रेमात आणावं !
By KALPESH SITARAM AHIRRAO

Comments