तुझं प्रेम मला मिळेल ना गं?
By KALPESH SITARAM AHIRRAO
बोलण्यापूरतं जे सोपं असतं,
खरं तर खूप अवघड असतं,
हे निरपेक्ष प्रेम कोणालाच हवं नसतं,
आपल्याला स्वकीरावं जे नेहमी वाटत असतं.
हेच प्रेम माझं आज तुझ्यावर आहे ग,
मग सांग ना,'तुझं प्रेम मला मिळेल ना गं?
सोबतीत तुझ्या हे क्षण सावरून आले,
भेटीत आपल्या दोघांचे मन जुळून आले,
माझ्या सहवासात आनंद तुला ही आले,
पण प्रेम तुझ्यावर फक्त मलाच झाले.
अपेक्षा नसणारं प्रेम फार कठीण होतंय ग,
मला सांग ना,'तुझं प्रेम मला मिळेल ना गं?
जागा प्रेमाची तुझीच राहील माझ्या हृदयास,
स्वीकारशील माझे प्रेम तू, ही लागली आस,
तुही माझ्यावर प्रेम करशील ही इच्छा मनास,
त्या दिवसाची ओढ ही रोज येते स्वप्नास.
तुझ्यावर मी असे प्रेम रोजच करतोय ग,
मला सांग ना,'तुझं प्रेम मला मिळेल ना गं?
By KALPESH SITARAM AHIRRAO

Comments