ती येते रोज
- Hashtag Kalakar
- 8 hours ago
- 1 min read
By Mohini C. Halarnkar
साांज माझी वेगळी ग
कवाडातून खुणावते मजला l
मी म्हणते मग थाांब जराशी
दिवा लावते ग िेवाला l
दिवा मग मी लावते पटकन
ती हसते मला बघून खुिकन l
आवरा आवर माझी बघते िडून
म्हणते ये ना ग आता पटकन l
येताना आणते गार वारा
शीण मग माझा जातो सारा l
हसतो माझा थकला चेहरा
हळूच गोंजारते माझ्या अधरा l
भेट ततची माझी
रोजच असते ठरलेली
मी लावते दिवा,
तेव्हाच ती असते आलेली l
येताना आणते
माझ्यासाठी गारवा
जाताना घेऊन जाते
. माझा सारा थकवा l
By Mohini C. Halarnkar

Comments