ती त्याच्यामध्ये काय शोधते?
- Hashtag Kalakar
- May 16, 2024
- 1 min read
Updated: Oct 2, 2024
By Manisha Nandgaokar
ती शोधते असा आधार,
जो तिला एकटेपणाची जाणीव कधीच होऊ देणार नाही.
ती शोधते अशी मैत्री,
जिथे एकमेकांचे सुख दुःख बेशक वाटता येईल.
ती शोधते अशी साथ,
अख्खं जग जरी विरोधात गेलं तरी तो तिच्यासोबत राहील.
ती शोधते अशी नजर,
जी तिच्या हसण्यामागे लपलेलं दुःख ओळखेल.
ती शोधते असा विश्वास,
जो तिच्या अनुपस्थिती मध्येही तिला दगा देणार नाही.
ती शोधते अशी हाक,
जिच्यामुळे काल झालेली टोकाची भांडणं आजचा संवाद थांबणार नाही.
ती शोधते असा संवाद,
ज्यात विषय नसला तरी दोघे एकमेकांचा आवाज ऐकायला तरसतील.
ती शोधते असा खांदा,
ज्यावर डोकं ठेवताच ती सगळी दुःख विसरेल.
ती शोधते अशी सावली,
जी अंधारात सुद्धा तिच्या सोबत राहील.
ती शोधते असा समुद्र,
ज्यामध्ये बुडल्यावर तिचा आनंद अथांग होईल.
ती शोधते असा माणूस,
जो तिच्यासाठी देवाइतकाच पूजनीय असेल.
ती शोधते असं वचन,
जे आयुष्याच्या प्रत्येक दिवशी तो तिच्यासाठी निभावेल.
By Manisha Nandgaokar

Comments