top of page

डोंबार्याचे व्यवस्थापन - By Sanjay Padmakar Kulkarni

Aug 17
6 min read

Written By: Sanjay Padmakar Kulkarni

Category: Short Story

Competition: Poetry and Creative Writing Competition 2026

In the Poetry and Creative Writing Competition 2026, Sanjay Padmakar Kulkarni, writing under the name Dombari, shares an insightful short story titled "डोंबार्याचे व्यवस्थापन." This piece delves into the fascinating world of a Dombari family and their unconventional approach to management. Highlighting the synergy and coordination within the family, Sanjay draws parallels between their lifestyle and modern management theories. His narrative offers a thought-provoking perspective on self-sufficiency and resilience through everyday experiences.

About the Work

Sanjay Kulkarni's "डोंबार्याचे व्यवस्थापन" presents the Dombari family as a model of traditional management practices. Through vivid imagery and keen observation, Sanjay captures the essence of their daily routines, emphasizing the importance of coordination, self-sufficiency, and commitment. The story contrasts the simplicity and effectiveness of this family's approach with modern life's complexities, urging readers to reconsider conventional definitions of success and efficiency.

Dombari

Original Submission by Sanjay Padmakar Kulkarni

डोंबार्याचे व्यवस्थापन

शीर्षक थोडे जगावेगळे आहे पण चिंतनीय निश्चितपणे आहे. आपण निरनिराळ्या अभ्यास क्रमातून management म्हणजे व्यवस्थापनाचा अभ्यास करतो, लाखो रुपये खर्च करून याचा IIM तसेच परदेशातील नामांकित शिक्षणसंस्थातून याचा अभ्यास केला जातो व यशस्वी विद्यार्थ्याना लाखो करोडो रुपयांची packages मिळतात.

आपण मुंबईच्या डबेवाल्यांचे व्यवस्थापन अभ्यासतो व जगभरात ते प्रसिद्ध ही होते, काही वर्षांपूर्वी श्री लालू प्रसाद यादव रेल्वे मंत्री असताना त्यांच्या व्यवस्थापन कौशल्याचे जगभर कौतुक झाले होते.

मात्र मी पाहिलेले,अनुभवलेले डोंबार्याचे व्यवस्थापन उल्लेखनीय व आगळंवेगळं आहे कारण येथे कुठले कॉलेज नाही, कुठलेही प्रशिक्षण नाही तर हे प्रत्यक्ष on the job स्वतः; आत्मसात करण्याचे व्यवस्थापन आहे.खरच हा थट्टेचा विषय नाही तर चिंतनाचा आहे

चुनाभट्टी स्टेशन वरून सकाळी ८.४७ ची वडाळा रोड लोकल पकडण्याचा माझा नित्यक्रम. वडाळा रोड स्थानकावर फलाट क्रमांक ३ वर उतरल्यावर फलाट क्रमांक १ वर जाण्यासाठी escalator वर एकदमच झुंबड उडते, मी मात्र निवांत पणे गर्दी कमी होण्याची वाट पाहत उभा राहतो, मुंबईची च गर्दी ती, एका मिनिटात कमी होऊन परत पुढच्या मिनिटाला परत वाढते. माझ्या सोबत एक डोंबार्याचे कुटुंब ही थोडा वेळ गर्दी कमी होण्याची वाट पाहत थांबलेले असते.

कुतूहलाने मी त्यांचे निरीक्षण करत असतो. कुटुंब प्रमुखाकडे एक श्रावण बाळासारखी कावड असते त्या कावडीच्या दोन्ही पारड्यात खूप अवजड गाठोडी असतात. कदाचित त्यांच्या खेळाची साधनं असावीत किंवा संसाराची गाठोडी, म्हणतात ना विंचवाचे बिर्हाड पाठीवर. कुटुंबाची लक्ष्मी, कपाळावर ठसठशीत रुपयाच्या आकाराचे कुंकू , चिप्प तेल लावून घातलेली वेणी, खांद्यावर मजबूत व भरीव साधारणता ७ ते८ फूट लांबीचे ४ ते ५ बांबू लिलया पेललेले आणि गळ्यात एक झोळी त्यात ८ ते १० महिन्याचे लेकरू-एवढ्या कोलाहलात निवांत झोपलेले असते तर कधी कधी इवल्या इवल्या डोळ्यांनी कुतूहलाने सर्वत्र टुकुमुकु पाहात असते---आणि हो येथेच त्याच्या व्यवस्थापन अभ्यासाचा श्रीगणेशा होत असतो.

या कुटुंबासोबत असतात आणखी दोन चिमुरडी, एक चुणचुणीत ८ ते ९ वर्षाची मुलगी, हातात स्टील ची मोठी रिंग. सतत ती रिंग गळ्यात घालते आणि परत हातात घेत बिनधास्त पणे बागडत असते, सोबत ५ ते ६ वर्षांचा चिमुरडी चा भाऊ असतो, त्याच्या गळ्यात एक ढोलक व त्याला वाजवण्यासाठी काड्या (स्टिकस), तोंडाने लॉलीपॉप चोखणे सुरु. असे हे पंचकोनी कुटुंब.

escalator वर ची गर्दी कमी होताच ही मंडळी पटकन पुढे सरकते आणि त्यावर उभी राहते, कोणी कोणाला बोलवत नाही कि चला चला म्हणत नाही , त्यांचे synchronization एकदम परफेक्ट असते.संसाराची अवजड कावड लिलया पेलत कुटुंब प्रमुख पुढे असतो,त्याच्या मागे दोन भावंडं व शेवटी लहान बाळासहित लक्ष्मी, खांद्यावर अवजड बांबूचे ओझे पेलून व कोणालाही ती लागणार नाहीत याची काळजी घेत ...........what a perfect movement

वडाळा रोड स्थानकावरून ९.०८ ची वांद्रे ला जाणारी लोकल पकडून मी वांद्रे स्थानकावर उतरतो. सकाळी १० ते संध्याकाळी ६.१५ पर्यंत ऑफिस...संध्याकाळी ६.३४ ची CSMT ला जाणारी लोकल पकडण्याचा माझा प्रयत्न असतो. संध्याकाळी वांद्रे स्थानकाबाहेर सकाळी भेटलेले डोंबार्याचे कुटुंब आपला खेळ करत असते. दोन बांबू एकमेकाला तिरकस बांधून दोन टोकांना उभे केलेले असतात व त्या दोन टोकांमध्ये एक तारवजा दोरी बांधलेली असते.आणि त्या दोरीवरून जमिनीपासून ८ ते १० फुटाच्या अंतरावरून ती चिमुरडी मुलगी कुठल्याही आधाराविना चालत असते,हातात एक बांबू आडवा धरलेले तोल सांभाळण्यासाठी.

17 Places ideas | places, thane, gol gumbaz

हे सर्व अनुभवणे हा माझा नित्यक्रम झाला आहे.नकळत मी माझ्या बालपणाची, माझ्या मुलांची व माझ्या संसाराची या डोंबाऱ्याच्या कुटुंबाशी तुलना करू लागलो आहे या यातून गवसली ती डोंबाऱ्याची management theory .

या कुटुंबातील synchronization किती परफेक्ट आहे बघा बिर्हाड पाठीवर घेऊन निघालेलं कुटुंब, ७ ते ८ महिन्याच्या बाळापासून ते कुटुंबप्रमुखापर्यंत कामाची विभागणी झालेली, कुठेच गोंधळ नाही गैरसमज नाही, कार्यालयीन भाषेत म्हणायचे तर " responsibilities are clearly defined ". कोणी कुठले ओझे उचलायचे, कोणी पुढे चालायचे तर सर्वात शेवटी कोण, स्टेशन वर movement कशी करायची आधीच ठरलेले. पुढे कुटुंब प्रमुख, मध्ये बच्चा पार्टी आणि शेवटी लक्ष्मी....Perfect Coordination ....

खेळ सुरु असताना हि ते ७ ते ८ महिन्याचे बालक शान्त पणे झोपलेले असते किंवा कुतूहलाने खेळ पाहात असते.. विनातक्रार. म्हणूनच सुरुवातीलाच मी म्हटले आहे कि याच वयात व्यवस्थापन अभ्यासाचा श्री गणेशा झालेला असतो.---Cooperation and Understanding ..

सगळ्यात महत्वाचा अभ्यास तारेवर चालणाऱ्या चिमुरडीचा आहे.. कसे बघा ती focussed आहे , ती चे target defined आहे आणि ते प्राप्त करण्यासाठी ती committed आहे, ती self sufficient आहे dependant नाही, responsible आहे , motivated आहे. येतंय का लक्षात ? आपण क्रमशः चर्चा करू

१) Focussed -तारेवरून चालतांना ती दुसऱ्या टोकाकडे यशस्वी पणे पोहोण्यासाठी Focussed आहे, एकाग्रपणे मार्गक्रमण करते आहे

२) Target Oriented -चिमुरडी चे target defined आहे , ते म्हणजे तारेचे दुसरे टोक. कुठलाही गोंधळ म्हणजे confusion नाही.

३) Commitment -ती Focussed आहे, टार्गेट फिक्स आहे आणि ते ती प्राप्त करणारच आहे ..म्ह्णूनच ती committed आहे.

४) Self sufficient - तारेवर ती स्वताचा अनुभव व कौशल्य यांच्या भरवशावर कुठलाही आधार न घेता चालते आणि कुटुंबाच्या उत्पन्नाचा आधार बनते आहे . आर्थिक दृष्ट्या ती परावलंबी नाही.

५) Motivation -Self Motivation -तारेचे जवळ येणार टोक त्या चिमुरडीला Self मोटिवेशन देते आहे तर आईच्या झोळीतील निरागस बालकांचे हास्य ती च्या साठी external motivation ठरते आहे.

--- आहे ना त्या बालिकेने आत्मसात केलेली Management Theory --आणि ती चा management गुरु आहे ती चा पिता ..कुटुंबप्रमुख ,,निरक्षर पण आपल्या च विद्यापीठाचा कुलगुरू ..

व्यवस्थापनाचे ४ तत्व ( Principles of management ) त्या ने व कुटुंबाने जन्मताच आत्मसात केलेले आहेत

1. Planning -हो उद्याचा खेळ कधी ,कुठे व कसा करायचा जेणेकरून जास्तीत जास्त पैसे मिळतील हे त्या कुटुंबाचे आधीच ठरलेले असते ...प्लॅन केलेले असते

२) Organizing -पाच जणांचे कुटुंब. सोबत बिर्हाड , डोक्यावर छप्पर नाही, बँकेत खाते नाही , कुठेलेही शिक्षण नाही , कुठलाही विमा नाही ..पण सगळे कसे organized ..एकीने

३) Coordination -पाच सदस्यांचे synchronization ..खेळात असो किंवा स्टेशन वरून ओझी वाहताना.. perfect coordination ...जबाबदाऱ्या ठरलेल्या ..कुठले हि confusion नाही .

४) Directing :- कुटुंबातील सर्व सदस्यांना योग्य त्या directives दिलेल्या आहेत. कुटुंबप्रमुख तोंडाने जनतेशी संवाद साधून त्याना आकर्षित करून बिदागी गोळा करतो आहे. माऊली गळ्यातले ढोलक वाजवून रस्त्याने जाणाऱ्यांचे लक्षत वेधते आहे आणि त्यासोबतच तारेवर चालणाऱ्या चिमुरडीला प्रोत्साहन ही देते आहे. लहान मुलगा स्टील च्या रिंग सोबत छोट्या मोठ्या कसरती करून खेळाची रंगत वाढवतो आहे.

नकळत मी त्या कुटुंबाची व आपल्या सध्याच्या जीवनशैलीची तुलना करू लागलो. आमची मुलं खरंच इतकी स्वयंपूर्ण व आत्मनिर्भर आहेत ? मुळीच नाहीत. ती पूर्णपणे परावलंबी असून शारीरिक व मानसिक दृष्ट्या कमकुवत आहेत. आजची सदोष शिक्षणपद्धती याला मोठ्याप्रमाणावर कारणीभूत आहे.७ ते ८ वर्षांची बालिका आत्मनिर्भर आहे तर त्याच वयोगटातील आमची बालकं जंकफूड खाऊन सुस्तावली आहेत. आपण ही त्यांना गुंतवून ठेवण्यासाठी नको त्या सुविधा देऊन आपली खरी जबाबदारी टाळून जबाबदारी पूर्ण केल्याचा आव आणण्यात व्यस्त आहोत, भौतिक सुखात मग्न आहोत,

डोक्यावर छप्पर नसलेले ते कुटुंब पुण्या मुंबईत तीन तीन फ्लॅट असणाऱ्या आमच्या पेक्षा ही सुखी आहे.अर्ध पोटी राहून ही ते कुटुंब मधुमेह, उच्च रक्तदाब , डिप्रेशन, ह्रिदयविकार या सारख्या आजारांपासून मुक्त आहेत मात्र आम्ही सलाड खाऊन , महागडी फळं खाऊन भरल्या पोटी या आजारांच्या विळख्यात सापडलो आहोत.

ढोलाच्या तालावर ते कुटुंब पोटासाठी कसरती करते आहे तर आम्ही संगीताच्या तालावर झुंबा करत श्वासासाठी , जगण्यासाठी संघर्ष करतो आहोत.

तुम्ही म्हणाल मग काय आम्ही पण डोंबारी व्हायचे का ? तर मुळीच नाही .मात्र आमच्या या नवीन पिढीला हा जगण्याचा संघर्ष, ही कसरत आत्मसात करणे गरजेचे आहे आणि हे डोंबार्याचे management आम्हा सगळ्यांना आत्मसात करणे गरजेचे आहे. सगळेच विनासायास न देता त्या साठी कष्ट करण्याची तयारी ठेवणे गरजेचे आहे. प्राप्त परिस्थितीत न डगमगता संघर्ष करत पुढे जाणे गरजेचे आहे. आणि यात पूर्ण कुटुंबाची भूमिका महत्वाची आहे , त्यांच्यात समन्वय, सुसंवाद असणे आवश्यक आहे.

डोंबार्याचे व्यवस्थापन ही फक्त एक संकल्पना आहे मात्र ती योग्य रित्या आत्मसात करून नव्या पिढीचे जीवन आत्मनिर्भर बनवणे निश्चित पणे आपल्या हाती आहे

About the Competition

The Poetry and Creative Writing Competition 2026 by Hashtag Kalakar is a prestigious platform celebrating the art of storytelling. It invites participants globally to share their unique voices and narratives. With a focus on creativity and expression, the competition showcases diverse works across poetry, short stories, essays, and creative writing, fostering a community of writers passionate about the written word.

We extend our heartfelt thanks to Sanjay Padmakar Kulkarni for his compelling contribution, "डोंबार्याचे व्यवस्थापन," to the Poetry and Creative Writing Competition 2026. His exploration of the Dombari family's management provides a refreshing lens through which to view resilience and coordination. We appreciate Sanjay's dedication to storytelling and look forward to more of his insightful work.

About Hashtag Kalakar

Hashtag Kalakar is a creative platform dedicated to providing artists, writers, singers and other creative talents with opportunities to showcase their work and reach wider audiences through competitions, features and creative initiatives.

 
 
 

Recent Posts

See All
Horizon - By Ruby-Rose

Written By: Ruby-Rose Category: Poetry Competition: Global Poetry and Creative Writing Competition 2026 We are delighted to feature "Horizon," a thought-provoking poem by Ruby-Rose, writing under the

 
 
 
Star Link - By Ruby-Rose

Written By: Ruby-Rose Category: Poetry Competition: Global Poetry and Creative Writing Competition 2026 Presenting "Star Link" by Ruby-Rose, showcased under the writing name Star Link. This evocative

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page